शिधापत्रिका शोधमोहिम शासकीय यंत्रणेमार्फत राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:48+5:302021-02-27T04:21:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ आयोजित जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील रेशन दुकानदारांचे अध्यक्ष आणि ...

शिधापत्रिका शोधमोहिम शासकीय यंत्रणेमार्फत राबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ आयोजित जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील रेशन दुकानदारांचे अध्यक्ष आणि सचिव यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम रेशन दुकानदारांतर्फे न राबवता शासकीय यंत्रणे मार्फत राबवावी, कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत लाभार्थ्याचा अंगठा न घेता परवाना धारकाचा अंगठा घेऊन धान्य वाटपाची अनुमती मिळावी, कोरोना काळात रेशन दुकानदारांनी दिलेल्या बारदानाचे पेमेंट मिळावे या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.
या प्रसंगी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी भेट देऊन चर्चा केली. या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, सचिव राजेश अंबुसकर, तुकाराम निकम, जमनादास भाटिया, सुनिल जावळे, भागवत पाटील, राजेश अंभोरे, महेंद्र बोरसे, के. के. पाटील, नितिन राठी, आर. डी. पाटील , प्रशांत भावसार, लियाकत खान, शुभांगी बिराडे, डी.डी. मोरे , गणेश जोगी, बाबू शेख, पिंटू पाटील, कृष्णा गंगावणे, इंदुबाई ठाकूर उपस्थित होते.