काँग्रेस आणि राष्ट्रवादी का़ँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:40 IST2018-05-19T23:40:38+5:302018-05-19T23:40:38+5:30
चाळीसगाव व अमळनेरला कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

काँग्रेस आणि राष्ट्रवादी का़ँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव/अमळनेर, जि.जळगाव, दि.१९ : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश येत असल्याचे दिसताच मुख्यमंत्री एस.डी.येदिरुप्पा यांनी शनिवारी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाकेही फोडण्यात आले.
चाळीसगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, माजी आमदार अॅड. ईश्वर जाधव, माजी नगरसेवक शिवाजी राजपूत, रमेश शिंपी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे, शोभा पवार यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.
अमळनेर येथेही जल्लोष करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पराग पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विनोद कदम, सुभाष पाटील, शिवाजीराव पाटील, प्रशांत भदाणे, सुनील शिंपी, अॅड.गिरीश पाटील, राजेंद्र देशमुख, युवकचे अध्यक्ष विश्वास पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे, रणजित पाटील, नीलेश देशमुख, संभाजी पाटील, इकबाल कुरेशी, इम्रान खाटीक, सचिन बेहरे, भटू पाटील, शरद पाटील हजर होते.