मोटारसायकलला समोरून कारची धडक, दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:15 IST2019-10-31T22:15:42+5:302019-10-31T22:15:46+5:30
रांजणगावजवळील घटना : पोलीसाचा समावेश

मोटारसायकलला समोरून कारची धडक, दोघे ठार
चाळीसगाव - येथून कन्नडकडे जाणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया कारने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले. रांजणगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला. मयतांमध्ये जळगावचे पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद एच.राठोड व त्यांचे मित्र यांचा समावेश आहे.
ही दुर्घटना घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घडली. रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे ठिक ठिकाणी मोठे खड्डे पडल्या मुळे कन्नड कडून भरधाव वेगाने येणाºया कारने ( एम.एच.१५- इ बी ५७७० ) धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची चर्चा आहे. मयत पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांचे सोबत असलेल्या त्यांच्या मित्राची ओळख अद्याप पटू शकले नाही. मयत राठोड हे चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते घटना घडताच पोलीस हवालदार योगेश बेलदार हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.