कारची धडक, मोटारसायकलस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 15:14 IST2019-04-28T15:14:16+5:302019-04-28T15:14:50+5:30
खडकदेवळा, ता. पाचोरा : जामनेर तालुक्यातील गोंडखेड-वाकी दरम्यान कार आणि मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ...

कारची धडक, मोटारसायकलस्वार जागीच ठार
खडकदेवळा, ता. पाचोरा : जामनेर तालुक्यातील गोंडखेड-वाकी दरम्यान कार आणि मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील रामधन हिराचंद तेली (वय ५८) हे सेवानिवृत्त वायरमन वाकी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमास हा अपघात झाला. घटनास्थळावरून जामनेर पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली असून याप्रकरणी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. रामधन यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार असून या घटनेने खडकदेवळा येथे हळहळ व्यक्त होत आहे.