दादावाडीतून कार लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:19 IST2021-03-09T04:19:07+5:302021-03-09T04:19:07+5:30

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या दादावाडीतील जैन मंदिरासमोर पार्किंग केलेली शेख जावेद शेख सलीम (२९,रा.मास्टर कॉलनी) या तरुणाची ...

The car drove away from Dadawadi | दादावाडीतून कार लांबविली

दादावाडीतून कार लांबविली

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या दादावाडीतील जैन मंदिरासमोर पार्किंग केलेली शेख जावेद शेख सलीम (२९,रा.मास्टर कॉलनी) या तरुणाची सव्वा लाख रुपये किमतीची कार (क्र.एम.एच.०४ एच.एन.२२९४) चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या हातातून मोबाइल लांबविला

जळगाव : रस्त्याने चालताना मोबाइलवर बोलत असतानाच मागून आलेल्या तरुणांनी मनीषा पुंडलिक सपकाळे (२९,रा.कानळदा, ता.जळगाव ह.मु.ओंकार नगर) यांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता गुरुद्वारासमोर घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रवीण भोसले करीत आहेत.

मेहरुणमधील तरुण अपघातात ठार

जळगाव : तालुक्यातील धामणगाव फाट्याजवळ झालेल्या रस्ता अपघातात सागर पोपट साबळे (२५,रा.मेहरुण) हा तरुण ठार झाल्याची घटना रविवारी घडली. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद बारी यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The car drove away from Dadawadi