भोवळ आल्याने कारचा अपघात, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:04 IST2019-06-11T22:03:10+5:302019-06-11T22:04:54+5:30

बिडगाव, ता. चोपडा येथून जवळच असलेल्या ब-हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा-पंचक रस्त्यादरम्यान गवळी नाल्याच्या पुलाला चारचाकी धडकल्याने जोरदार अपघात ...

A car crash, a serious accident due to giddiness | भोवळ आल्याने कारचा अपघात, एक गंभीर

भोवळ आल्याने कारचा अपघात, एक गंभीर



बिडगाव, ता. चोपडा येथून जवळच असलेल्या ब-हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा-पंचक रस्त्यादरम्यान गवळी नाल्याच्या पुलाला चारचाकी धडकल्याने जोरदार अपघात झाला. कारचालकास भोवळ आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट पुलाच्या असलेल्या कठड्यांवर आदळली. यात कारचालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अडावद येथील सुरेश बाहेती हे शैक्षणिक कामानिमित्त सकाळी जळगाव येथे गेले होते. दुपारी काम आटोपून ते कारने (क्रमांक एम.एच. ४१, सी. २७०१) घरी परतत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास धानोरा ते पंचकदरम्यानच्या गवळी नाल्यावर हा अपघात घडला. स्वत: सुरेश बाहेती गाडी चालवत असताना त्यांना भोवळ आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार गवळी नाल्याच्या पुलावरील कठड्यांवर जाऊन धडकली. यात स्वत: सुरेश बाहेती यांच्यासह मुलगी पायल (वय १८) जखमी झाले असून मुलगा कृष्णा (वय १३) यास पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून १०२ रुग्णवाहिकेतून जळगाव येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.





 

Web Title: A car crash, a serious accident due to giddiness