कार मागे घेताना धक्का लागल्याने हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:40+5:302021-06-22T04:12:40+5:30

जामनेर : चारचाकी वाहन मागे घेत असताना धक्का लागल्याने गाडी मालकासह ८ ते १० जणांना सातजणांना बेदम मारहाण ...

The car collided with the back of the car | कार मागे घेताना धक्का लागल्याने हाणामारी

कार मागे घेताना धक्का लागल्याने हाणामारी

जामनेर : चारचाकी वाहन मागे घेत असताना धक्का लागल्याने गाडी मालकासह ८ ते १० जणांना सातजणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी सोमवारी खडकी (ता. जामनेर) येथील सातजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी एकाने गावठी पिस्तूल काढल्याची चर्चा गावात आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

जुगल बंडू नाईक (खडकी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे भाचे डॉ. शाम चव्हाण हे त्यांची कार मागे घेत असताना गावातील आकाश मोरे यास गाडीचा धक्का लागल्याने चव्हाण व त्यांच्यासोबत असलेल्या ८ ते १० जणांना अशोक बंडू मोरे, सुखराम भिल, विक्रम भिल, अमोल साबळे, ईश्वर भिल, भागवत सोनवणे (सर्व खडकी) यांनी मारहाण केली. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३९५, ४५२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. चव्हाण हे जखमी असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.

Web Title: The car collided with the back of the car