गुरे चोरून नेणारी कार पकडली
By Admin | Updated: October 25, 2015 23:54 IST2015-10-25T23:54:07+5:302015-10-25T23:54:07+5:30
धुळे : तालुक्यातील अंचाळे शिवारातील शेतातून गाय व वासरू चोरी करून घेऊन जाणा:या कारला नागरिकांनी पकडल़े

गुरे चोरून नेणारी कार पकडली
धुळे : तालुक्यातील अंचाळे शिवारातील शेतातून गाय व वासरू चोरी करून घेऊन जाणा:या कारला नागरिकांनी पकडल़े मात्र अंधाराचा फायदा घेऊन तिघे चोरटे फरार झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुकटी ते शिरूड चौफुली रस्त्यावर घडली़ अंचाळे येथे राहणारे सुरेश साळुंखे यांच्या शेतातील शेडमधून गुरे चोरीचा प्रयत्न झाला़ मात्र त्यांचा मुलगा तेथेच झोपलेला होता़ त्याने आरडा-ओरड केली़ त्यानंतर जवळील नागरिकांनी कारला अडविल़े तालुका पोलिसांनी कार व गुरे ताब्यात घेतली आहेत़ याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता़