भुसावळात ३ दुकाने तोडून भरधाव कार उलटली, ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:34 IST2018-06-14T19:34:51+5:302018-06-14T19:34:51+5:30

भुसावळ शहरातील जामनेर रोडवर बुधवारी मध्यरात्रीनंतर भरधाव कारने तीन दुकानांना तोडत उलटल्याने त्यात चार तरुण जखमी झाल्याची घटना घडली.

 The car broke down in 3 hours, and the car broke down, four injured | भुसावळात ३ दुकाने तोडून भरधाव कार उलटली, ४ जखमी

भुसावळात ३ दुकाने तोडून भरधाव कार उलटली, ४ जखमी

ठळक मुद्दे अपघातात चार तरुण जखमी जामनेर रोडवरील थरार हॉटेलमधून परतत होते तरुण

आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.१४ : भरधाव वेगाने जात असतांना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने तीन दुकांनाना तोडत ही कार उलटून त्यात चार जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास जामनेर रस्त्यावर घडली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस सूत्रानुसार, बुधवारी मध्यरात्रीनंतर सुनसान असलेल्या जामनेर रोडवर शहरातील सिंधी कॉलनीत राहणारे तरुण मित्र गौरव लुल्ला, गौरव मनवानी, निखिल रत्नानी आणि समित रावे हे रात्री एका हॉटेलमधून चारचाकी गाडी (क्रमांक- एमएच-०५-९००१ ) ने येत असताना भरधाव वेगातील वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीसह दोन दुकानांना तोडून विरुद्ध दिशेने जाऊन उलटले. या अपघातात चारचाकीतील चारही तरुण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हे.कॉ. मोहम्मद सय्यद करीत आहेत.

Web Title:  The car broke down in 3 hours, and the car broke down, four injured