कार व मालवाहू वाहन समोरासमोर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 13:21 IST2017-09-18T13:04:43+5:302017-09-18T13:21:17+5:30
भरधाव जाणारी कार व टोमॅटो घेऊन येणारे मालवाहू वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने त्या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर टोमॅटोच्या नेणाºया वाहनाचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे तीन वाजता महामार्गावर शासकीय मुलींच्या आयटीआयजवळ झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार व मालवाहू वाहन समोरासमोर धडकले
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ : भरधाव जाणारी कार व टोमॅटो घेऊन येणारे मालवाहू वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने त्या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले तर टोमॅटोच्या नेणाºया वाहनाचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे तीन वाजता महामार्गावर शासकीय मुलींच्या आयटीआयजवळ झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इरफान इकबाल बागवान (रा.शाहू नगर, जळगाव) यांच्या मालकीची मालवाहू गाडी (क्र.एम.एच.१९ बी.एम.५४६२) नाशिक येथून टोमॅटो घेऊन जळगावला येत असताना पहाटे तीन वाजता महामार्गावर मुलींच्या शासकीय आयटीआयसमोर नागपूर येथून येणारी विना क्रमांकाची नवी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात दोन्ही वाहने रस्त्याच्याकडेला आले. त्यात टोमॅटोची गाडी पलटी झाली तर चालक जुबेरखान शरीफ खान (वय ३३ रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) हा चालक जखमी झाली. छातीला व डोक्याला मार लागल्याने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.