शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

जळगावात वाळूच्या डंपरची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:55 IST

सुभाष चौक परिसरात तणाव

ठळक मुद्देसायंकाळी बंदी असतानाही सर्रास वाहतूकनागरिकांनी अडविला डंपर

जळगाव : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याच्या कारणावरुन सुभाष चौक परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजता तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, वाळूचे हे डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.धक्कादायक म्हणजे, सायंकाळी सहा वाजेनंतर वाळू वाहतुकीस बंदी असतानाही सर्रास वाहतूक सुरु असल्याने हा अपघात झाला. महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.नागरिकांनी अडविला डंपरयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लोकेश गजानन मराठे (रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे कामानिमित्त शहरात आलेले होते. सुभाष चौक परिसरात राजकमल टॉकीज चौकाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी त्यांची कार (क्र.एम.एच.१९ सी. एफ.५००६) पार्कींग केलेली होती. रात्री ९ वाजता सुभाष चौकाकडून वाळूने भरलेला डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ४००९) याच रस्त्याने जात असताना कारला डंपरने धडक दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मराठे यांनी डंपरला अडविले. तेव्हा डंपर चालक अशोक जाधव व क्लिनर याने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रस्त्यावरील लोकांनीच डंपर चालकाला खाली उतरविले. काही मिनिटातच शंभराच्यावर जमाव जमला होता.डंपर पहूर येथीलकाही जणांनी डपरची तोडफोड करण्याची तयारी केली, तितक्यात शनी पेठ पोलीस स्टेशनचे गिरीश पाटील व रवींद्र पाटील तेथे पोहचले. त्यांनी गर्दीला पांगवून डंपर चालकाला ताब्यात घेऊन डंपर पोलीस ठाण्यात नेला. पहूर येथील गणेश सोनार यांच्या मालकीचा हा डंपर असल्याचे निष्पन्न झाले.प्रशासनाचा आशीर्वादशहरातून अवजड वाहनांना बंदी असतानाही वाळूची वाहने प्रशासनाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे वापरत आहेत.गेल्या महिन्यात याच रस्त्यावर चौबे शाळेजवळ वाळूच्या डंपरने वृध्दाला उडविले होते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव