शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

तर उमेदवारांना आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:12 IST

जळगाव : कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांकडून नावनोंदणी करण्यात येत असते. परंतु, बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधारकार्ड क्रमांक प्रोफाईलमध्ये जोडलेले नसल्याचे, ...

जळगाव : कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांकडून नावनोंदणी करण्यात येत असते. परंतु, बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधारकार्ड क्रमांक प्रोफाईलमध्ये जोडलेले नसल्याचे, त्याचबरोबर आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक केलेले नसल्याचे निदर्शनास आढळून आलेले आहे़ त्यामुळे तात्काळ उमेदवारांनी आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा ३१ आॅगस्ट अखेर नोंदणी रद्द करण्यात येईल, असे संबंधित विभागातर्फे कळविण्यात आले आहे.जिल्ह्यातील उमेदवारांची आॅनलाईन नांवनोंदणी सन २०१३ पासून कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर सुरु असून उमेदवारांकडून विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन नावनोंदणी करीतच आहेत. आॅनलाईन नांवनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुशंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो. मात्र, अद्यापही आॅनलाईन नांवनोंदणी केलेल्या बहुतांश उमेदवारांनी त्यांचे आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद केलेला नाही. तसेच आधारक्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांकही नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होत आहे़ तरी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या संकेतस्थळावर तात्काळ अपडेट न केल्यास नोंदणी ३१ आॅगस्ट, अखेर रद्द होईल. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९़४५ ते संध्या ६़१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनJalgaonजळगाव