‘प्रताप’च्या आठ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:06+5:302021-09-24T04:21:06+5:30
अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागामार्फत एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे बी.एस्सी. व एम.एस्सी. संगणकशास्त्रच्या अंतिम ...

‘प्रताप’च्या आठ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड
अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागामार्फत एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे बी.एस्सी. व एम.एस्सी. संगणकशास्त्रच्या अंतिम वर्षातील एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कॅम्पस ड्राइव्ह ऑनलाइन प्रणालीद्वारे घेण्यात आला.
यात वैष्णवी साळुंखे, प्रेरणा पाटील, वैशाली पाटील, पूजा बोरसे, प्रियांका पाटील, करिश्मा पाटील, कमलेश महाजन, संजना भंडारी हे निवड झालेले विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. प्रताप महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या नियुक्तीबद्दल खा.शि. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर. शिरोडे, उपप्राचार्य डॉ. एम.एस. वाघ, उपप्राचार्य डॉ. जी.एच. निकुंभ, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कॅम्पस ड्राइव्हसाठी विविध स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पुष्पा पाटील, प्रा. अमित शिंदे, प्रा. नेहा आगलावे, प्रा. तृप्ती चौधरी, प्रा. वैष्णवी साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.