कॅमे:यावर कापड टाकून डाळ चोरी
By Admin | Updated: October 5, 2015 01:07 IST2015-10-05T01:07:08+5:302015-10-05T01:07:08+5:30
जळगाव : औद्योगिक वसाहतीतील सदाजी अॅग्रो इंडस्ट्रीजमधून प्रवेशद्वाराची कडी तोडून आठ टन 900 किलो मूग डाळ चोरटय़ांनी लांबविल्याचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला.

कॅमे:यावर कापड टाकून डाळ चोरी
जळगाव : औद्योगिक वसाहतीतील सदाजी अॅग्रो इंडस्ट्रीजमधून प्रवेशद्वाराची कडी तोडून नऊ लाख 79 हजार रुपये किमतीची आठ टन 900 किलो मूग डाळ चोरटय़ांनी लांबविल्याचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीत व्यापारी संजय सुंदरलाल पारप्यानी (वय 34, रा.आदर्शनगर) यांची सदाजी अॅग्रो इंडस्ट्रीज नावाची दाल मिल आहे. शनिवारी संध्याकाळी दाल मिलला कुलूप लावून सर्व कामगार घरी गेल्यावर रात्री चोरटय़ांनी पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या गेटची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरी करण्यापूर्वी चोरटय़ांनी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांवर कपडा टाकला. त्यानंतर कट्टय़ात भरलेली आठ टन 900 किलो मुगाची डाळ बाहेर काढून एका वाहनातून लांबविण्यात आली. रविवारी सकाळी संजय पारप्यानी यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनला धाव घेऊन घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. गेल्या महिन्यातही औद्योगिक वसाहतीतून डाळ लांबविल्याचा प्रकार घडला होता. वारंवार घडणा:या या प्रकारामुळे उद्योजक वर्गात दहशतीचे वातावरण असून चोरटय़ांचा शोध लावला जावा, अशी मागणी केली जात आहे.