एरियाचा दादा म्हणत कुल्फी विक्रेत्याला चौघांकडून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:00+5:302021-03-25T04:17:00+5:30
जळगाव : अजिंठा चौफुली येथे हातगाडीवर कुल्फी विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कुल्फीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने चार तरुणांनी त्याला ...

एरियाचा दादा म्हणत कुल्फी विक्रेत्याला चौघांकडून बेदम मारहाण
जळगाव : अजिंठा चौफुली येथे हातगाडीवर कुल्फी विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कुल्फीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने चार तरुणांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कासमवाडीतील रहिवासी असलेले नयन अनिल भदाणे यांची अजिंठा चौफुली येथे लेटेस्ट मावा कुल्फी नावाची गाडी आहे. बुधवारी २४ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता ते नेहमीप्रमाणे आपल्या गाडीवर कुल्फी विक्रीचा व्यवसाय करीत होते. गाडीवर इरफान खान उर्फ इल्लू याच्यासह इतर ३ तरुण कुल्फी खाण्यासाठी आले. कुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने आम्ही या एरियाचे दादा आहे, आम्हाला पैसे मागतो का म्हणत चौघांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. चौघांनी नयन याच्यासह त्याचा मावस भाऊ लोकेश अरुण वाणी व मावसा अरुण पांडुरंग वाणी यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत नयन याचे डोके फुटले असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणांकडून मारहाण सुरू असताना लोकेशने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.