तळोदा पालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

By Admin | Updated: September 29, 2015 23:41 IST2015-09-29T23:41:51+5:302015-09-29T23:41:51+5:30

तळोदा : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क) मधून विजयी झालेल्या योजना भरत माळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Bypolls released for one seat of Taloda municipality | तळोदा पालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

तळोदा पालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

तळोदा : तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क) मधून विजयी झालेल्या माजी नगराध्यक्षा योजनाबाई भरत माळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात नव्याने ज्या नगरपंचायती अस्तित्वात आल्या त्यांच्या व इतर पालिकेच्या पोटनिवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क) च्या रिक्त जागेचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीचा जाहीर कार्यक्रम असा : 1 ते 8 ऑक्टोबर 2015 ला सकाळी 11 ते तीन वाजेर्पयत नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारणे (सार्वजनिक सुटी व रविवार दिवस सोडून). 8 ऑक्टोबर दुपारी तीन वाजेर्पयत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, 9 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र छाननी व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, 19 रोजी दुपारी तीन वाजेर्पयत नामनिर्देशन पत्र मागे घेणे. अंतिम दिनांक व निवडणूक चिन्ह वाटप करणे, 26 रोजी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करणे, आवश्यकता वाटल्यास रविवार, 1 नोव्हेंबर रोजी मतदान घेणे. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी, 6 रोजी राजपत्रात यादी प्रसिद्धी. याप्रमाणे पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात नव्याने निर्माण झालेल्या 67 नगरपंचायती व 17 नगरपालिकांमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क)ची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने शहरात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Web Title: Bypolls released for one seat of Taloda municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.