शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कपडे खरेदीसाठी शिरपूर येथून जळगाव येथे आलेल्या तरुणाला ट्रकने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:41 IST

मामेभावाचा मृत्यू तर आतेभाऊ जखमी

ठळक मुद्देमहामार्गावर पुन्हा अपघातओव्हरटेक करताना दुचाकीला उडविले

जळगाव : जळगाव शहरातून नवीन कपडे व मोबाईल खरेदी करुन एरंडोल येथे जात असताना समोरुन ओव्हरटेक करताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने उडविल्याने सागर प्रताप अहिरे (वय १८, रा.बालाजी मंदिराजवळ, शिरपूर, जि.धुळे) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मामाचा मुलगा कन्हैय्या सदाशिव महाले (वय १७, रा. एरंडोल) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राष्टÑीय महामार्गावर महामार्ग पोलीस चौकीजवळच झाला.ट्रक चालकाला घेतले ताब्यातहा अपघात होताच महामार्ग चौकीवरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले. सागर याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कन्हैय्या याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, पाळधी पोलिसांनी ट्रक चालक राजेंद्रसिंग ठाकूर (रा.उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. हा ट्रक ठाणे येथून जयपूर जात होता.कमावता तरुण गेलासागर याच्या वडीलांचे निधन झालेले आहे, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे. आई गृहीणी आहे. सागर हा कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता. तो कंपनीत कामाला होता. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच एरंडोल येथील मामा, मामी व अन्य नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, ट्रक चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले असले तरी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.ओव्हरटेक करताना दुचाकीला उडविलेयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सागर प्रताप अहिरे हा तरुण एरंडोल येथील मामा सदाशिव महाले यांच्याकडे आलेला होता. शनिवारी मामांचा मुलगा कन्हैय्या याला घेऊन तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.पी.७३१५) जळगाव शहरात कपडे व मोबाईल घेण्यासाठी आला होता. शहरातील काम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता दोन्ही मामेभाऊ-आतेभाऊ एरंडोल जाण्यासाठी निघाले. साडे तीन वाजता राष्टÑीय महामार्गावर महामार्ग पोलीस चौकीजवळच एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र .एम.एच.०४ जे.के.३२३२) ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला उडविले. त्यात मागे बसलेला सागर हा लांब फेकला गेला व डोक्याला मार बसल्याने जागीच गतप्राण झाला.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव