शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चातक संस्थेने हतनूर जलाशयावर केली फुलपाखरू गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 11:46 IST

चातक संस्थने हतनूर जलाशयावर फुलपाखरू गणना केली, त्यात ६० प्रजातींची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्दे६० प्रजातींची केली नोंददेशभरातील गणनेत चातक संस्थेचा सहभाग

संकेत पाटीलखिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करत असतात. अशा फुलपाखरांची गणना चातक निसर्ग संवर्धन संस्थेमार्फत हतनुर येथील जलाशयावर रविवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत 'बिग बटरफ्लाय मंथच्या निमित्ताने फूलपाखरू गणना करण्यात आली. परिसरातील पक्षीमित्र व इच्छुक या उपक्रमात सहभागी झाले होते. यात हतनूर जलाशय परिसरात विविध आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली फुलपाखरांच्या संवर्धनासाठी भारतात सप्टेंबर महिना बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्यात येत आहे. मोहिमेत ३५ संस्था सहभागी असून यातीलच चातक निसर्ग संवर्धन संस्थेने सहभाग नोंदवून यात गणना केली.आढळले फुलपाखरू -जास्त संख्येने क्रिमसन टीप (केशर टोक्या), व्हाईट ऑरेंज टीप (पंधरा शेंदूर टोक्या), येलो ओरंज टीप (पिवळा शेंदूर टोक्या), मोटल एमिग्रँट (चट्टेरी भटक्या), कॉमन एमिग्रँट (भटक्या), पॉइनर (गौरांग), कॉमन ग्रास येलो (तृण पिलाती), डानाईड इगफ्लाय (छोटा चांदवा), टावनी कॉस्टर (कृष्ण कमलिनी) यांच्यासह ६० प्रजातींची नोंद करण्यात आली.यावेळी गणनेत अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, सदस्य श्री महाजन, समीर नेवे, सौरभ महाजन, प्रशांत पाटील, संजय पाटील, शमनोज बडगुजर यांनी सहभाग नोंदविला.सप्टेंबर ह्यबटरफ्लाय मंथह्ण;सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ह्यबटरफ्लाय मंथह्ण म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात यांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.फुलपाखरू हे जैवविविधते मधील महत्वाचा घटक आहे. पर्यावरणातील परागीभवनाचे महत्वाचे काम ते करतात. फुलपाखरू हे उत्तम पर्यावरणाचे इंडिकेटर आहे, निसर्ग सौंदर्यात ते भर घालतात. त्यांचे निरीक्षक केल्याने तणाव, थकवा नाहीसा होऊन उत्साहात भर पडते. आजच्या गणनेत या भागात दुर्मिळ असलेले आफ्रिकन मरब्लेड स्कीपर ( संगमरवरी सैराट) व डार्ट प्लाम डार्ट (गडद शर) यांची नोंद घेण्यात आली. सदर गणनेची माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व बॉम्ब न्याचरल हिस्ट्री सोसायटी याना कळविण्यात येईल.-उदय चौधरी, फुलपाखरू अभ्यासक सचिव, चातक निसर्ग संवर्धन संस्था.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यRaverरावेर