बस- ट्रकच्या धडकेने अजिंठा घाटातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 18:56 IST2017-10-07T18:55:53+5:302017-10-07T18:56:47+5:30

अजिंठा घाटात एस. टी. महामंडळाची बस आणि ट्रक यांचा शनिवार ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यामुळे अजिंठा घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

Bus - Traffic jam in Ajanta Ghat by truck torch | बस- ट्रकच्या धडकेने अजिंठा घाटातील वाहतूक ठप्प

बस- ट्रकच्या धडकेने अजिंठा घाटातील वाहतूक ठप्प

आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर,दि.७ - अजिंठा घाटात एस. टी. महामंडळाची बस आणि ट्रक यांचा शनिवार ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यामुळे अजिंठा घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
सोयगांव औरंगाबाद बस क्र. एम. एच. २० बी एल २१९८ औरंगाबाद कडे प्रवाशी घेवून जात होती. या दरम्यान पाऊस झाल्याने रस्ते ओले झाले होते. अजिंठा घाटात औरंगाबाद कडून येणारी मालवाहतूक ट्रक क्र. एन. एल. ०१ क्यू १२२१ हिचे वळण रस्त्यावर ब्रेक न लागल्याने सरळ बस वर येवून धडकली. यात बसच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे बराच वेळ जळगाव व औरंगाबाद या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती.

Web Title: Bus - Traffic jam in Ajanta Ghat by truck torch