खड्ड्यात फसली बस, २० प्रवाशांना वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:30 IST2018-10-10T01:29:12+5:302018-10-10T01:30:05+5:30
खराब रस्त्यामुळे खड्ड्यात बस फसून उलटता उलटता वाचली, यातून प्रसंगावधान राखत २० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

खड्ड्यात फसली बस, २० प्रवाशांना वाचविले
बोदवड : खराब रस्त्यामुळे खड्ड्यात बस फसून उलटता उलटता वाचली, यातून प्रसंगावधान राखत २० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ आगाराची बस क्र. एम एच २०, डी ८२२० ही भुसावळ देवळसगाव फेरीसाठी बोदवड बस स्थानकातून सुटली. त्या वेळेस बसमध्ये पाच विद्यार्थी व वृद्ध महिलांसह वीस प्रवासी होते. ही बस जामठीमार्गे जाते. परंतु बोदवड जामठी रस्त्याचे काम सुरू असल्याने सदर बस चिखली रस्त्याने वळविण्यात आली असता बोदवड पासून दीड किमी अंतरावर चिखली रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून जातांना फसली.