जळगावात ट्रकची बसला जोरदार धडक

By Admin | Updated: May 5, 2017 15:41 IST2017-05-05T15:41:42+5:302017-05-05T15:41:42+5:30

आकाशवाणी ते इच्छादेवी दरम्यान अपघात. अध्र्यावर बसचा पत्रा कापला : चालक व वाहक गंभीर जखमी.

The bus catches fire in Jalgaon | जळगावात ट्रकची बसला जोरदार धडक

जळगावात ट्रकची बसला जोरदार धडक

 जळगाव,दि.5 - यावल तालुक्यातील खिरोद्याहून जळगाव बसस्थानकाकडे  येत असलेल्या बसला समोरून येत ट्रकने जोरदार धडक दिली़ या जोरदार धडकेत बसचालकाच्या बाजूने अध्र्यावर बसचा पत्रा कापला गेला़ या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व वाहक हे असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत़ राष्ट्रीय महामार्गावर विनोद हॉस्पीटलसमोर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़

यावल डेपोची बस (एम.एच. 20 बी.एल. 0932) ही खिरोदा येथून पहाटे जळगावला प्रवासी घेऊन निघाली होती. सात वाजेच्या सुमारास बसने जळगावात प्रवेश केला़ आकाशवाणी चौकातून बस नवीन बसस्थानकाकडे जात होती़ यादरम्यान समोरून अंजिंठा चौफुलीकडे जात असलेल्या ट्रकने (एम.एच. 19 ङोड. 5356) बसला जोरदार धडक दिली़ 
अपघातात बस चालक भागवत पदमाकर लोहार (45) रा़ यावल, वाहक तेजसिंग ठाणसिंग राजपूत (52) रा़यावल व ट्रक चालक आदिलखान नवाजखान (21) रा़ समतानगर हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत़ तर बसमधील किरकोळ दुखापत झालेल्या पाच ते सहा प्रवाशांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The bus catches fire in Jalgaon