खावटी किट वाटून नेणारी बस रुतली उकीरड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:31+5:302021-09-06T04:19:31+5:30

नांदेड, ता. धरणगाव : अमळनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात आदिवासी भिल्ल बांधवांसाठी खावटी किट पोहोचण्यासाठी जात असलेली मालवाहू बस सावखेडा ...

The bus carrying khawti kits is in Rutli Ukiradya | खावटी किट वाटून नेणारी बस रुतली उकीरड्यात

खावटी किट वाटून नेणारी बस रुतली उकीरड्यात

नांदेड, ता. धरणगाव : अमळनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात आदिवासी भिल्ल बांधवांसाठी खावटी किट पोहोचण्यासाठी जात असलेली मालवाहू बस सावखेडा गावाजवळ उकीरड्यांमध्ये रुतल्याची घटना ४ रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान घडली.

जळगाव आगाराची महाकार्गो माल वाहतूक करणारी बस (एमएच-१४/बीएफ००९७) ही सावखेड्यातील आदिवासी बांधवांना वाटप करण्यासाठीचे खावटी किट घेऊन भिल्ल वस्तीकडे जात असताना रस्त्यालगतच छोटा टेम्पो उभा होता. बस तिथून जात असताना रस्त्याला लागूनच असलेल्या उकीरड्यांमध्ये खोलवर रुतली. चालकाकडील पुढील व मागील चाकासह बसचा पत्रादेखील जमिनीला टेकलेला होता.

बसचा चालकाकडील भाग जवळच असलेल्या विजेच्या पोलला लागलेला असल्यामुळे दुपारपासून रात्री पावणेआठ वाजेपर्यंत गावाचा संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. अमळनेर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून बसला टोचण करून अखेर उकीरड्यामध्ये खोलवर रुतलेल्या बसला बाहेर काढण्यात आले.

रस्त्याची दुर्दशा, जबाबदार कोण?

या ठिकाणी रस्त्याची कमालीची दुर्दशा होऊन खड्डे पडून उंचवटे निर्माण झाले आहेत. शिवाय रस्त्याला लागूनच उकीरडेदेखील आहेत. गटारींचे पाणीदेखील रस्त्यावर येत असते. परिणामी दोन वाहने समोरासमोरून येताना मोठी अडचण निर्माण होते. सततच्या चिखलामुळे वाहने घसरून अपघात होण्याचीही भीती असते. रस्त्याच्या दुरुस्तीसह दोन्ही बाजूंना गटारींची या ठिकाणी अतिशय गरज असताना याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

050921\20210904_155959.jpg~050921\05jal_1_05092021_12.jpg

खावटी कीट वाहून नेणारी महाकार्गो मालवाहतूक करणारी बस उकीरड्यात अशी रुतली होती _ छाया -राजेंद्र रडे~सावखेडा गावाजवळ मालवाहू बस अशी उकीरड्यांमध्ये खोलवर रूतलेली होती. (छाया : राजेंद्र रडे)

Web Title: The bus carrying khawti kits is in Rutli Ukiradya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.