पहूरजवळ बस व ट्रकचा अपघात
By Admin | Updated: June 7, 2017 15:43 IST2017-06-07T15:43:39+5:302017-06-07T15:43:39+5:30
एस.टी.मधील 15 ते 20 प्रवासी जखमी

पहूरजवळ बस व ट्रकचा अपघात
>ऑनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर दि.7- पहुर - वाकोद रस्त्यावरील जिनींग जवळील पेट्रोल पंपा शेजारी एम.एच.20 बी. एल. 3580 व माल वाहतूक ट्रक एम. एच. 21 एक्स. 6398 यांच्यात झालेल्या अपघातात एस.टी. बस मधील 15 ते 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातातील जखमींवर पहुर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले तर काहीना जळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारा साठी पाठविण्यात आले आहे. अपघातातील जखमी पुढीलप्रमाणे - रामकिसन गोसावी (वडाळी), प्रल्हाद बोडके (भारुडखेडा), शे.मोहम्मद अजहर (औरंगाबाद), प्रांजल भागवत, मेघा भागवत (रावेर), सायली वरकड, मंजीरा वरकड, माया वरकड (अमरावती), राजेन्द्र भिलके (बोदवड), रसूल शेख (गुजरात), दुर्गा जोगी, सोनाली जोगी (भागदरा), नर्गिस शेख (सिल्लोड), शाहरुख समसोद्दीन (बिहार), ईमरान रईस (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. बस चालक शेख मोहम्मद अजहर मोहम्मद अली यांच्या फियार्दी वरून पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.