अंगणवाडी सेविकेचे घर जाळले
By Admin | Updated: October 16, 2015 00:30 IST2015-10-16T00:30:48+5:302015-10-16T00:30:48+5:30
नंदुरबार : अंगणवाडी सेविकेची बदली झाल्याने रागाच्या भरात चौघांनी तिचे घरच जाळल्याची घटना पांढरामातीचा जांभीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली.

अंगणवाडी सेविकेचे घर जाळले
नंदुरबार : अंगणवाडी सेविकेची बदली झाल्याने रागाच्या भरात चौघांनी तिचे घरच जाळल्याची घटना पांढरामातीचा जांभीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, पांढरामातीचा जांभीपाणीपाडा येथील इंदिराबाई रामसिंग पाडवी या अंगणवाडी सेविका आहेत. त्यांची बदली जांभीपाणीपाडा येथे झाली. त्याचा राग गावातीलच नारसिंग रोडवा वसावे, रागा खत्र्या वळवी, मुळाजी खात्र्या वळवी व किसन हिरमा वळवी यांना आला. त्यातून त्यांनी इंदिराबाई हिच्याशी वादही घातला. त्या वादातूनच चौघांनी आपले कुडाचे घर जाळल्याचा आरोप इंदिराबाई यांनी केला. या घटनेत घरासह सर्व सामान जळून खाक झाला. आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नारसिंग वसावे, रागा वळवी, मुळाजी वळवी, किसन वळवी यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सी.बी.गांगुर्डे करीत आहे.