संगमनेर अपघातातील तिघांचा जामनेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:20 IST2019-12-13T18:19:26+5:302019-12-13T18:20:10+5:30
संगमनेरजवळील हंगेवाडी शिवारात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.

संगमनेर अपघातातील तिघांचा जामनेर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी
जामनेर, जि.जळगाव : संगमनेरजवळील हंगेवाडी शिवारात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी ६ वाजता तिघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून येथे आल्यावर नागरिकांनी एकाच गर्दी केली. तिघांचे मृतदेह कब्रस्तानाजवळ एकत्र येताच कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाही. तिघांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या गाडीवर हमालीसाठी गेलेले शेख परवेझ शेख नासिर, शेख जुनेद शेख भिकन व शेख फरमान शेख हारून हे हंगेवाडीकडून परत येत असताना वाहन उलटले. त्यात ते त्याखाली दाबले जाऊन गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता तिघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित नातेवाईकांसह नागरिकांना अश्रू अनावर होत होते. माजी मंत्री गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी,उपनगराध्यक्ष अनिस शेख, कैलास शर्मा, शंकर राजपूत, प्रफुल्ल लोढा, विलास राजपूत, प्रल्हाद बोरसे आदी उपस्थित होते.
शेख फरमान हा पाच बहिणीतील एकुलता एक भाऊ होता. तिघांचे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे होते. या दुर्दैवी घटनेने इस्लामपूर व घरकुल परिसरात शोककळा पसरली होती.