एसएमआयटी कॉलेज परिसरात महिलेकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST2021-02-11T04:17:54+5:302021-02-11T04:17:54+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीबाई पाटील या ताई बंगलो या निवासस्थानात आई लताबाई ईश्वर पाटील, बहिण कविता संतोष पाटील, तिची ...

Burglary at a woman on the premises of SMIT College | एसएमआयटी कॉलेज परिसरात महिलेकडे घरफोडी

एसएमआयटी कॉलेज परिसरात महिलेकडे घरफोडी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीबाई पाटील या ताई बंगलो या निवासस्थानात आई लताबाई ईश्वर पाटील, बहिण कविता संतोष पाटील, तिची मुलगी प्रांजल अशांसह वास्तव्याला आहे. डोंबिवली येथे राहणारा भाऊ उन्मेष व बहीण सुनीता असे ६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याकडे आले होते. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता सर्व जण घराला कुलुप लावून बोरखेडा, ता.धरणगाव येथे गेले होते. ८ रोजी दुपारी १२ वाजता शेजारी राहणाऱ्या शारदा वाघ यांनी घराचे सर्व दरवाजे उघडे असल्याची माहिती कळविली, त्यानुसार दुपारी तीन वाजता सर्व घरी आले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटात ठेवलेले सोन्याचे टॉप्स, कानातील रिंग, सोन्याचे पेंडल, नाकातील नथ असा १८ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पाटील यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यावरून रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary at a woman on the premises of SMIT College