ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे साडेतीन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:21+5:302021-07-07T04:19:21+5:30

जळगाव : खेडी परिसरातील साईगीता नगरात चंचल टेकचंद शर्मा (वय ४१) यांच्याकडे साडेतीन लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ...

Burglary of Rs 3.5 lakh from a transport professional | ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे साडेतीन लाखांची घरफोडी

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे साडेतीन लाखांची घरफोडी

जळगाव : खेडी परिसरातील साईगीता नगरात चंचल टेकचंद शर्मा (वय ४१) यांच्याकडे साडेतीन लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शर्मा हे कुटुंबासह महिनाभरापासून दिल्ली येथे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. शर्मा यांची रोहित रोडवेज नावाने जळगावात ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्तीला घरफोडी झाल्याचे लक्षात आले. सोमवारी सायंकाळी शर्मा कुटुंबीय घरी परतले. या प्रकरणी त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली.

Web Title: Burglary of Rs 3.5 lakh from a transport professional