शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सैन्य दलाच्या जवानाकडे घरफोडी; मुंबईला जाताच रात्री चोरट्यांनी घर फोडले

By सुनील पाटील | Updated: July 6, 2024 15:30 IST

रात्री चोरट्यांनी घर फोडून २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तळेले कॉलनीत घडली

जळगाव : सैन्य दलात जवान असलेल्या निखिल महाजन यांचे संपूर्ण कुटूंब कामानिमित्ताने मुंबईला गेले अन‌् त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी घर फोडून २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तळेले कॉलनीत घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सैन्यात असलेले निखील महाजन यांचे कुटूंब तळेले कॉलनीत वास्तव्याला आहे. पत्नी हेमांगी, दीर अक्षय महाजन व आई असे सध्या या घरात वास्तव्याला आहे. महाजन कुटूंब ४ जुलै रोजी सकाळी मुंबईला गेले होते. त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात व पेटीत ठेवलेली १ लाख १० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅमचे लहान बाळाचे सोन्याचे पताका, आणखी एक ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १८ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे सोन्याचे कानातील अभूषण, २ ग्रॅम वजनाचे कानातील अभूषण व ६० हजार रुपये रोख असा २ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार ५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. ही घटना समजताच महाजन कुटूंबाने जळगाव गाठले. शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भा.न्या.स.कलम ३३१ (४)ल ३०५(ए) गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.  

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीIndian Armyभारतीय जवान