चाळीसगावला डॉक्टरांच्या घरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:43+5:302021-09-15T04:21:43+5:30

डॉ.विवेक बळवंतराव बोरसे हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. डॉ.बोरसे हे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घराला ...

Burglary at doctor's house in Chalisgaon | चाळीसगावला डॉक्टरांच्या घरात घरफोडी

चाळीसगावला डॉक्टरांच्या घरात घरफोडी

डॉ.विवेक बळवंतराव बोरसे हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. डॉ.बोरसे हे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते दुपारी ४.३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी सात वाजता ते झोपेतून उठल्यावर त्यांना लोखंडी कपाटाला चावी लावलेली असल्याचे दिसून आली. त्यावर त्यांनी कपाटात पाहणी केली असता, त्या कपाटात ठेवलेले दोन लाख सहा हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. घरात शोधाशोध केल्यावर पैसे मिळून आले नाहीत. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने पैसे चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसात भादंवि कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डिकले करीत आहेत.

Web Title: Burglary at doctor's house in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.