पाचोऱ्यात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:01 IST2019-11-26T22:01:01+5:302019-11-26T22:01:22+5:30

कडी कोयंडा तोडला : रोकड व दागिने लंपास

Burglary in the cage | पाचोऱ्यात घरफोडी

पाचोऱ्यात घरफोडी

पाचोरा : बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोकड व दागिने असा सुमारे २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहरातील संघवी कॉलनीत घडली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, हर्षल मनोहर सोनगिरे यांचे संघवी कॉलनीतील रहाते घर चार दिवसांपासून बंद होते. मध्यरात्री बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाट तोडून कपाटातील ५ ग्रॅमची अंगठी व साडेचार हजार रुपये रोख लंपास केल्याचे निदर्शनास आले. घरमालक हर्षल सोनगिरे हे २६ रोजी सकाळी घरी आल्यावर चोरीचा उलगडा झाला. याबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एक चोरी
याच वेळी याच कॉलनीत अशोक पाटील यांचेही घर फोडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र संबंधित कुुटुंब हे बाहेरगावी असल्याने किती चोरी झाली याची माहिती मिळू शकली नाही. तर अन्य एकाची मोटारसायकल चोरीस नेण्याचा प्रयत्न यावेळी फसला. घरातील महिलेस जाग आल्याने कंपाऊन्ड मधून दुचाकी नेणारे चोरटे दुचाकी न घेताच पसार झाले.

Web Title: Burglary in the cage