रामनगरात भरदिवसात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:02+5:302021-06-19T04:12:02+5:30
जळगाव : मेहरूण परिसरातील रामनगरात वास्तव्यास असलेले शेख सद्दाम अब्दुल वहाब यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत ५२ हजार ...

रामनगरात भरदिवसात घरफोडी
जळगाव : मेहरूण परिसरातील रामनगरात वास्तव्यास असलेले शेख सद्दाम अब्दुल वहाब यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता उघडकीस आली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगरातील रहिवासी शेख सद्दाम अब्दुल वहाब (२८) हा पत्नीसोबत वास्तव्यास असून, फेब्रिकेशनचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी १२ वाजता ते सिलिंडर भरण्यासाठी भिलपुरा येथे गेले होते काही वेळाने त्यांच्या पत्नी आयशा या सुद्धा घराला कुलूप लावून समोरचं राहत असलेल्या वडिलांकडे गेल्या. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. ही संधी साधत चोरट्यांनी घरात डल्ला मारला.
साडेचार वाजता उघडकीस आली घटना
दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सद्दाम शेख हे घरी आले़ त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी याबाबत त्यांची पत्नी आयशा यांना संपर्क साधून सांगितले असता त्यांनी तत्काळ घरी धाव घेत घरात पाहणी केली. त्यावेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तसेच कपाटातील दागिने व पैसे कपाटात दिसून आली नाही.
५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
चोरट्याने कपाटात ठेवलेली ३० हजार रुपये रोख व २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.