घरफोडी करण्यापूर्वी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: July 2, 2017 17:59 IST2017-07-02T17:59:11+5:302017-07-02T17:59:11+5:30

कल्याण येथील दोघे व पिंप्राळ्यातील एकास पकडले

Before the burglars, they were trapped in police custody | घरफोडी करण्यापूर्वी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडी करण्यापूर्वी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 - घरफोडी करण्याच्या तयारीत असतानाच राजकुमार रामखिलावन जयस्वाल (वय 20), कृष्णा नामदेव भोईटे (वय 22) दोन्ही रा.खडे कलोली, ता.कल्याण जि.ठाणे व शेख फारुख शेख बिसमिल्ला (वय 22,रा.पिंप्राळा, जळगाव) या तिघांना पोलिसांनी रविवारी रात्री अडीच वाजता महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गस्तीवर पकडले.
 एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल हेमंत कळसकर,किशोर पाटील, विजय पाटील व भास्कर ठाकरे हे शनिवारी रात्री गस्तीवर होते.  रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तिघे  संशयास्पदरित्या आढळून आले.
पोलीस आल्याचे पाहून एकाने हातातील टॉमी लांब फेकून दिली. त्यांची चौकशी केली असता तिघांच्या बोलण्यात तफावत जाणवत होती. दरम्यान, रात्रीच या तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी तिघांवर कलम 122 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली. तिघांना दुपारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करुन सकाळी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले.

Web Title: Before the burglars, they were trapped in police custody