धुळशहरात दोन ठिकाणी घरफोडी

By Admin | Updated: May 20, 2014 01:08 IST2014-05-20T01:08:47+5:302014-05-20T01:08:47+5:30

धुळे : देवपूर भागात एकाच वेळेस दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला.

Burglar at two places in Dhule City | धुळशहरात दोन ठिकाणी घरफोडी

धुळशहरात दोन ठिकाणी घरफोडी

धुळे : देवपूर भागात एकाच वेळेस दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्त मंदिर परिसरातील विद्यानगर येथे राहणारे प्रभाकर श्रीराम पाटील हे रविवारी रात्री त्यांच्या परिवारासह घराच्या छतावर झोपलेले होते. गादीच्या खाली ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा ऐवज चोरट्यांनी लांबविला. सकाळी दागिने व रोकड आढळून न आल्याने याप्रकरणी प्रभाकर पाटील यांनी फिर्याद दिली. तसेच पंचवटी भागात राहणारे हिरालाल मोरे व त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. १६ ते १८ मेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मोरे कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना घटना कळविली. याप्रकरणी ऊर्मिला मोरे यांनी फिर्याद दिली. देवपूर पोलीस ठाण्यात चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Burglar at two places in Dhule City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.