धानोरा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST2017-08-06T16:48:43+5:302017-08-06T16:54:15+5:30

आॅनलाईन लोकमत धानोरा, जि.जळगाव , दि...५ : येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. तर एक दुचाकीही लंपास केली. सुदैवाने ती महामार्गालगत सापडली.

Bunker at two places at Dhanora, one night | धानोरा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

धानोरा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

ठळक मुद्देचोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. एक दुचाकीही लंपास केली. पोलिसांकडून घटनास्थळाची पहाणी
नलाईन लोकमत धानोरा, जि.जळगाव , दि...५ : येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी चोरी झाली. चोरट्यांनी जवळपास २० हजाराचा ऐवज लंपास केला. तर एक दुचाकीही लंपास केली. सुदैवाने ती महामार्गालगत सापडली.आस्थानगरातील रहिवाशी शिक्षक अविनाश नागो पवार हे बाहेरगावी गेले आहे. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील दोन ग्रॅम सोन, व आठ हजार रूपये रोख असा एकूण १४ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणारे शिक्षक मधुकर शांताराम भाई यांच्या लक्षात चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली.तर दुसरी चोरीची घटना महामार्गावरी शकीलाबी पिंजारी यांच्याकडे घडली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सहा हजार रूपये रोख लंपास केले.पिंजारी यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला होता. चोरट्यांनी लक्ष्मी नगरातील रहिवाशी राजेंद्र पंडीत साळुंखे यांची दुचाकी चोरून नेली. मात्र ती महामार्गावर सोडून दिली.दोन्ही घटनास्थळी अडावदचे सहायक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, कॉन्स्टेबल चंपालाल पाटील, अय्युब तडवी, पोलीस पाटील दिनेश पाटील, यांनी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी अद्याप अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: Bunker at two places at Dhanora, one night