The buffalo hit the lightning touch | वीजतारेच्या स्पर्शाने म्हैस दगावली

वीजतारेच्या स्पर्शाने म्हैस दगावलीबिडगाव,ता.चोपडा : परिसरात तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने ८० हजारांची म्हैस दगावल्याची घटना २४ रोजी घडली.
बिडगावसह परिसरात वीजपुरवठा करणा-या धानोरा येथील वीजवितरण कार्यालयाअंतर्गत अशा प्रकारची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटल्यावर वारंवार माहिती देऊनही ती न जोडल्याने येथील शेतकरी हैदर नामदार तडवी यांची ८० हजार रुपये किमतीची म्हैस दगावली.
याबाबत अडावद पोलीस स्टेशनचे एएसआय जगदीश कोळंबे यांनी ८० हजार रुपये नकसानीचा पंचनामा केला. अडावदचे पशुधन अधिकारी नितीन सोनवणे व धानो-याचे तेजभूषण चौधरी यांनी शवविच्छेदन केले.

 

Web Title: The buffalo hit the lightning touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.