वीजतारेच्या स्पर्शाने म्हैस दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:08 IST2019-08-26T00:08:06+5:302019-08-26T00:08:11+5:30
बिडगाव,ता.चोपडा : परिसरात तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने ८० हजारांची म्हैस दगावल्याची घटना २४ रोजी घडली. बिडगावसह परिसरात वीजपुरवठा करणा-या धानोरा ...

वीजतारेच्या स्पर्शाने म्हैस दगावली
बिडगाव,ता.चोपडा : परिसरात तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने ८० हजारांची म्हैस दगावल्याची घटना २४ रोजी घडली.
बिडगावसह परिसरात वीजपुरवठा करणा-या धानोरा येथील वीजवितरण कार्यालयाअंतर्गत अशा प्रकारची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटल्यावर वारंवार माहिती देऊनही ती न जोडल्याने येथील शेतकरी हैदर नामदार तडवी यांची ८० हजार रुपये किमतीची म्हैस दगावली.
याबाबत अडावद पोलीस स्टेशनचे एएसआय जगदीश कोळंबे यांनी ८० हजार रुपये नकसानीचा पंचनामा केला. अडावदचे पशुधन अधिकारी नितीन सोनवणे व धानो-याचे तेजभूषण चौधरी यांनी शवविच्छेदन केले.