‘अमृत’च्या कामामुळे बीएसएनएलचे ४३ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST2020-12-15T04:33:02+5:302020-12-15T04:33:02+5:30
मनपातर्फे शहरात अमृत योजनेअंतर्गत रस्त्यांवर खोदाई करून पाइप टाकण्यात येत आहे. मनपाकडून मक्तेदारातर्फे अमृतचे काम करण्यात येत असून, सध्या ...

‘अमृत’च्या कामामुळे बीएसएनएलचे ४३ लाखांचे नुकसान
मनपातर्फे शहरात अमृत योजनेअंतर्गत रस्त्यांवर खोदाई करून पाइप टाकण्यात येत आहे. मनपाकडून मक्तेदारातर्फे अमृतचे काम करण्यात येत असून, सध्या हे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, या कामासाठी खोदण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे जमिनीच्या आत टाकण्यात आलेल्या बीएसएमएलच्या केबल मोठ्या प्रमाणावर तुटत आहेत. यामध्ये अंडरग्राउंड कॉपर केबल व ओएसटी केबल डॅमेज झाल्या आहेत. यामध्ये शहरात आतापर्यंत अमृतचे ज्या-ज्या ठिकाणी काम झाले आहे. त्या सर्व ठिकाणी केबलचे नुकसान झाले असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, केबल तुटल्यामुळे नागरिकांचे दूरध्वनी व केबल बंद राहत असल्यामुळे, नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचेही बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
नुकसानभरपाईसाठी सहावेळा पत्र, तरीही भरपाई मिळेना :
अमृत योजनेच्या कामामुळे केबल तुटून होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबत बीएसएनएलतर्फे २०१८ पासून ते आतापर्यंत सहावेळा नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याबाबत मनपा आयुक्तांसह अमृतच्या ठेकेदारांना पत्र देण्यात आले आहे. तसेच नुकसानीचा तपशील देण्यात आला आहे. मात्र, अद्याप नुकसानभरपाईची कुठलीही रक्कम मिळालेली नाही. अमृतच्या कामांबाबत होणाऱ्या बैठकांमध्ये नुकसानभरपाई मिळण्याबाबत फक्त आश्वासन देण्यात येत असल्याचेही बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अमृतच्या कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटत असल्याने, ग्राहकांची गैरसोय होत आहे. फोन व नेट कनेक्शन बंदमुळे ग्राहकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. केबल जोडणीसाठी साधन सामुग्री खरेदीसाठींही बीएसएनएलकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे, दर्जेदार काम होत नाही. काम करताना केबलची काळजी घेतल्यास, बीएसएनएलचे नुकसान होणार नाही आणि ग्राहकाचींही गैरसोय होणार नाही.
संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, जळगाव विभाग
इन्फो :
आयुक्त कोट बाकी.