मोटारसायकल अपघातात शालक-मेहुणे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:47+5:302021-08-13T04:21:47+5:30
लक्ष्मण बबन भिल (३९) व शालक दीपक मगां भिल (३०, रा. बहादरपूर ता. पारोळा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. ...

मोटारसायकल अपघातात शालक-मेहुणे ठार
लक्ष्मण बबन भिल (३९) व शालक दीपक मगां भिल (३०, रा. बहादरपूर ता. पारोळा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघे जण बहादरपूरकडून कासोद्याकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.
बबन भिल याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी तर दीपक याच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत. एकाच घरातील दोन जण अपघातात मृत्यूमुखी पडल्याने बहादरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धडक लागताच चालक वाहन सोडून फरार झाला. दोघांना पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पारोळा रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, अक्षय चौधरी, अभिजित राजपूत, जयदेव चौधरी, दीपक सोनार यांनी मदत केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.