खंडित दुभाजक देतोय अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:36+5:302021-06-19T04:11:36+5:30
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. हरताळा फाटा गावाच्या ठिकाणी ...

खंडित दुभाजक देतोय अपघाताला आमंत्रण
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. हरताळा फाटा गावाच्या ठिकाणी पूल असून, सलग दुभाजक टाकण्यात आले आहे. मात्र हरताळा फाट्यावरून भुसावळकडे जात असताना तीन हॉटेलजवळ मधेच दुभाजक खंडित केला आहे. यामुळे हा अपघाताला आमंत्रण देत आहे. एकाच ठिकाणी तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हे ठिकाण व्यावसायिक असल्याने येथे दुभाजकाला खंड का ठेवण्यात आला ? असाही प्रश्न विचारला जात आहे. खंडित असलेला दुभाजक बंद करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून जाणकारांकडून करण्यात येत आहे.
नुकतेच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम पूर्णत्वास येत असताना येथील जवळच असलेल्या तीन हॉटेलजवळ सलग असलेला दुभाजक खंडित करून याच ठिकाणी दोन लाल दिवे लावण्यात आले आहे. येथे भरधाव वेगाने येणारे वाहन व हॉटेलवरील मार्गावर लागणारे वाहन अचानक कळत नकळत येत असल्याने अपघात वाढले आहे. तरी मध्येच खंडित ठेवण्यात आलेला डिव्हायडर सलग करण्यात यावा व अपघात टाळावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
... असे झालेत अपघात
सहा महिन्यांपूर्वी दोन जानेवारीस तालुक्यातील एका शाळेच्या कर्मचार्याचा या हॉटेललगतच अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या महिन्यातच याच खंडित दुभाजक लगत याच जागेवर कोथळी येथील दोन दुचाकी स्वार अपघातात जागीच ठार झाले होते. याचबरोबर तसेच मध्ये दुभाजकामध्ये लहान वृक्ष लावण्यात आलेली असून, या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देत असताना भरधाव वाहनाने टँकरला धडक दिल्याचीही घडली होती. सहा महिन्यांतील या तीन घटना घडल्याचे सांगितले जाते.
दखल घेण्याची मागणी
भविष्यात अपघाताच्या अशा अनेक दुर्घटना रोखण्यासाठी येथील खंडित दुभाजक सलग करून होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो कॅप्शन : १९ एचएसके ०१
हरताळा फाट्यावरून भुसावळकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलजवळ असलेला मधेच खंडित केलेला दुभाजक.