शेकोटी पेटविल्याच्या कारणावरून डोक्यात घातली वीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST2021-02-09T04:18:19+5:302021-02-09T04:18:19+5:30

जळगाव : अंगणात शेकोटी पेटविल्याच्या कारणावरून मोहनसिंग बावरी याने भजनसिंग मितसिंग बावरी (३६) यांच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याची ...

Brick put on the head for the reason of lighting the fire | शेकोटी पेटविल्याच्या कारणावरून डोक्यात घातली वीट

शेकोटी पेटविल्याच्या कारणावरून डोक्यात घातली वीट

जळगाव : अंगणात शेकोटी पेटविल्याच्या कारणावरून मोहनसिंग बावरी याने भजनसिंग मितसिंग बावरी (३६) यांच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता तांबापुरात घडली. याप्रकरणी जगदीशसिंग बावरी, सोनू बावरी व मोहनसिंग बावरी (सर्व रा. शिरसोली नाका, तांबापुरा) या तिघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भजनसिंग याने रविवारी रात्री स्वत:च्या घरासमोरच पोलच्या बाजूला शेकोटी पेटविली होती. तेथे मुलांसह शेकोटीवर थांबलेले असताना जगदीशसिंग हरसिंग बावरी याने लहान मुलांना शेकोटी का पेटविली म्हणून जाब विचारून शिवीगाळ केली. यावेळी भाऊ प्रकाशसिंग बावरी याने शिवीगाळ का करतो म्हणून विचारले असता जगदीशसिंग याचा मुलगा सोनूसिंग याने त्यांना हातातील कड्याने मारून दुखापत केली, तर मोहनसिंग याने जमिनीवर पडलेली वीट भजनसिंग यांच्या डोक्यात घातली.

Web Title: Brick put on the head for the reason of lighting the fire