शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक अखेर अमळनेर पालिकेच्या सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:19 IST

पालिकेच्या सफाई कामगाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाºया हैबतीराव पाटील यांना सेवेतून अखेर बडतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांना या अगोदर निलंबीत करण्यात आले होते.

ठळक मुद्दे२०११ मध्ये घडले होते लाच प्रकरणपाटील यांना झाली होती शिक्षा आणि दंडही

लोकमत आॅनलाईनअमळनेर, दि.१३ : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली शिक्षा झालेले नगर पालिकेचे तत्कालीन स्वच्छता निरीक्षक हैबतराव माधवराव पाटील यांना १३ नोव्हेंबरपासून पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. २०११ मध्ये हैबतराव पाटील यांना सफाई कामगाराकडून पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. यात पाटील यांना शिक्षा आणि दंडही करण्यात आला होता. पाटील यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते, मात्र त्यांना न्यायालयाने दिलासा दिला नव्हता. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश नगर पालिकेला दिला होता. परंतु नगरपालिकेकडून याबाबत टाळाटाळ केली जात होती, असे जाणकारांचे म्हणणे होते. मात्र याबाबत मंत्रालयस्तरावर कार्यवाही सुरूच होती.मुंबई येथील मंत्रालयातील नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी यांच्या ३ जून २०१७ च्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील यांना बडतर्फ करण्याचे आदेश नगरपालिकेला दिल्याने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ (३) व ४ च्या तरतुदी नुसार १३ नोव्हेंबर २०१७ पासून पाटील यांना नगर पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अशा पद्धतीने लाच लुचपत प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर सेवेतून बडतर्फ झाल्याची अमळनेर नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ही पहिलीच घटना आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAmalnerअमळनेर