शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्र्गांच्या कामास अतिक्रमणांचा बे्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:42 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह जळगाव -औरंगाबाद तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा येत असल्याची ...

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह जळगाव-औरंगाबाद तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा येत असल्याची बाब सोमवारी झालेल्या बैठकीत समोर आली. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्थांच्या भिंती, त्यांच्या मालकीची संकूल, जलवाहिन्यांचा समावेश असून काही धार्मिक ठिकाणी स्थळेही मध्ये येत असल्याचे समोर आले. ही सर्व अतिक्रमणे काढण्याविषयी उपाययोजना करून महामार्गाचे कामे वेगाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, औरंगाबाद मार्गाचे काम गतिमान करण्याच्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.चौपदरीकरणाच्या कामातील अडथळ्यांसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी अधिकाºयांनी भूसंपादन, अतिक्रमण या विषयी समस्या मांडल्या. तरसोद ते चिखली दरम्यानच्या कामामध्ये भुसावळ येथील शहीद स्मारक रस्त्याच्या कामाच्यामध्ये येत असून या सोबतच भुसावळ न.पा.ची पाण्याची टाकी अडथळा ठरत आहे़ काही ठिकाणी आमदार निधीतील हायमास्ट दिवेही अडथळा ठरत आहेत. भुसावळमध्येच नवोदय विद्यालयाची भिंतही रस्त्याच्या कामात येत असून वरणगाव येथे जलवाहिनीची क्रॉसिंग अडथळा ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे सर्व अडथळे एक महिन्यात स्थलांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.सालबर्डी ग्रामपंचायतीचे व्यापारी संकूलाचाही अडथळा असल्याने संबंधित बांधकामाचे पैसे ग्रामपंचायतला देऊन ते पाडण्याविषयी सूचना देण्यात आल्या. या सोबतच घोडसगाव-चिखली ग्रामपंचायतचे शौचालयदेखील रस्त्यात येत असल्याने त्याचा मोबदला देऊन ते बांधकाम काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव