पाचोऱ्यात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:39+5:302021-09-16T04:21:39+5:30

पाचोरा : येथील भडगाव रोडकडील राधाकृष्ण रेसिडेन्सीमधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १५५ ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास साडेसहा ...

Brave burglary in Pachora | पाचोऱ्यात धाडसी घरफोडी

पाचोऱ्यात धाडसी घरफोडी

पाचोरा : येथील भडगाव रोडकडील राधाकृष्ण रेसिडेन्सीमधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १५५ ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. यात पावणेदोन लाख रुपये रोख आहेत. ही घटना भडगाव रोडवर राधाकृष्ण रेसिडेन्सीमधील घरात घडली.

राधाकृष्ण रेसिडेन्सी भागातील रहिवासी असलेल्या मेडिकल व्यावसायिक मंगला वसंत सूर्यवंशी यांच्याकडे ही चोरी झाली. मंगला सूर्यवंशी यांचे पती सेवानिवृत्त सैनिक यांचे काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. यामुळे मंगला सूर्यवंशी यांनी पाचोरा येथील बस स्टँड परिसरात भाचाच्या मदतीने औषधी दुकानाचा व्यवसाय सुरू केला. दि ११ रोजी त्या भाचा ज्ञानेश्वर पाटील याच्याबरोबर जळगाव येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. घरी न येता भाचाकडेच मुक्कामी राहिल्या.

घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, मोहनमाळ, अंगठी, कानातील टोंगल, मंगळसूत्र, सोन्याचा तुकडा असा १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम १ लाख ७७ हजार असा एकूण ६ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास झाला. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फोन मंगला सूर्यवंशी यांना आल्याने त्यांनी घरातील परिस्थिती पाहून मोठी चोरी झाल्याची खबर पाचोरा पोलिसांना दिली. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विकास पाटील करीत आहेत. दरम्यान, पाचोऱ्यात घरफोडीचे सत्र जोरात सुरू असून पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे.

Web Title: Brave burglary in Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.