भुसावळ पालिका सभेत बहिष्कार नाट्य

By Admin | Updated: June 1, 2014 00:21 IST2014-06-01T00:21:57+5:302014-06-01T00:21:57+5:30

विकासकामे होत नसल्याने सभेवर टाकलेल्या बहिष्काराने आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गा

Boycott drama in Bhusawal Palika Sabha | भुसावळ पालिका सभेत बहिष्कार नाट्य

भुसावळ पालिका सभेत बहिष्कार नाट्य

 भुसावळ : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभारी मुख्याधिकार्‍यांवर अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत मंजूर करण्यात आलेला ठराव, मूलभूत सुविधांविषयी सत्ताधार्‍यांसह विरोधी नगरसेवकांनी व्यक्त केलेला तीव्र रोष तसेच अपक्ष नगरसेवकाने विकासकामे होत नसल्याने सभेवर टाकलेल्या बहिष्काराने आजची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली़ शनिवारी सकाळी ११़२० वाजता झालेल्या सभेत पीठासन अधिकारी नगराध्यक्ष उमेश नेमाडे होते़ व्यासपीठावर उपनगराध्यक्ष नूरजहाँ आशिक खान, गटनेते हाजी नईम पठाण उपस्थित होते़ सभेत शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, स्मशानभूमीत पथदिवे बंद असल्याने अंत्यसंस्कारासाठी होणारे हाल याबाबत सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ अपक्ष नगरसेवकाचा बहिष्कार प्रभाग पाचचे अपक्ष नगरसेवक निर्मल कोठारी यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागात कुठलीही विकासकामे झाली नसल्याने सभेवर बहिष्कार टाकल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले़ नगराध्यक्षांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्याकडून कुठलीही विकासकामे वॉर्डात करण्यात आली नाहीत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे़ सभेच्या शेवटी नगराध्यक्ष नेमाडे म्हणाले, अकार्यक्षम मुख्याधिकार्‍यांमुळे शहराचा विकास ठप्प झाला असून त्यांना राजाश्रय लाभल्याने ते असे करीत आहेत. इसारा रक्कम सर्वत्र एक टक्के असताना मुख्याधिकारी जाणीवपूर्वक अडीच टक्के आकारत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. २६ जून रोजी उमेश नेमाडे यांचा कार्यकाळ संपत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Boycott drama in Bhusawal Palika Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.