वाढदिवस आटोपून परतणारे दोघे ठार

By Admin | Updated: September 22, 2015 00:36 IST2015-09-22T00:36:22+5:302015-09-22T00:36:22+5:30

पाळधीजवळ ट्रक व कारची धडक : शेंदुर्णीजवळील दुस:या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

Both of those who returned from the wedding were killed | वाढदिवस आटोपून परतणारे दोघे ठार

वाढदिवस आटोपून परतणारे दोघे ठार

जळगाव/ शेंदुर्णी : वाढदिवस साजरा करून घरी परत येत असताना समोरून येणा:या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नितेश शंकरलाल शर्मा (वय 30) रा. गंधर्व कॉलनी व रितेश रामलाल पाटील (वय 30) रा.शिवकॉलनी, जळगाव हे दोघं मित्र जागीच ठार तर अमित विजय भावसार (वय 31) रा.वाघुळदेनगर हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाळधी बायपासवर हा अपघात झाला. दुस:या घटनेत शेंदुर्णी येथे बसने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत आसिफ शेख मोहम्मद शरीफ (27, रा.पिंपळगाव हरेश्वर) हा मयत झाला. तर अन्य एक जण जखमी झाला.

अमित, रितेश व नितेश हे तिघे जण कारने (एमएच 15- बीएक्स 3079) एरंडोलकडून जळगावकडे येत असताना समोरून येणा:या ट्रकने (डब्ल्यूबी 23- सी.9682) तिघांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात नितेश व रितेश हे दोघं जागीच ठार झाले. अपघातानंतर ग्रामस्थ व पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना जिल्हा रुग्णालयात हलविले. अमितला नंतर खासगी रुग्णालयात हलविले.

अमितचा होता वाढदिवस

प्राप्त माहितीनुसार रविवारी अमितचा वाढदिवस होता. त्याने एरंडोल येथे भाडे तत्त्वावर हॉटेल चालविण्यास घेतली आहे. तेथील काम आटोपून जळगावला परत येत असताना हा अपघात झाला.

ट्रकचालक संजय मंगल (रा.कोलकाता) हा धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

शेंदुर्णी येथील अवलीबाबा दग्र्याजवळ बस क्रमांक एमएच 06- पीएस 8688 वरील चालकाने एमएच 19 -के 4427 या मोटार सायकलला सोमवारी संध्याकाळी धडक दिली. यात दुचाकीस्वार आसिफ शेख मोहम्मद शरीफ हा उपचारासाठी नेत असताना मयत झाला. तर जुबेर गेग राजू बेग मिङरा (19, रा.शिंदाड, ता.पाचोरा) हा गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकी जवळपास 50 फुटांर्पयत दूरवर फेकली गेली. अपघातानंतर बसचालक सखाराम मडकू बारी हे घटनास्थळी थांबून होते. याप्रकरणी रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Both of those who returned from the wedding were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.