तांबापुरा हाणामारीप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: June 7, 2017 15:33 IST2017-06-07T15:33:48+5:302017-06-07T15:33:48+5:30
परस्परविरोधी तक्रारी : खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त कायम

तांबापुरा हाणामारीप्रकरणी दोघांना अटक
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.7- तांबापुरा भागातील मासळी मार्केटजवळ मंगळवारी रात्री दहा वाजता दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी योगेश शेनफडू हटकर (गवळी) व भूषण शेनफडू हटकर (दोन्ही रा.गवळीवाडा, तांबापुरा जळगाव) या दोघांना बुधवारी पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली.
तांबापूरातील मकसूद शेख सलीम खाटीक यांच्या बकरीला योगेश हटकर याच्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन हटकर व खाटीक या दोन गटात वाद होवून त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले होते. यात मकसूद खाटीक, सलीम शेख बिसमिल्ला खाटीक, रईसाबी शेख सलीम खाटीक व शबाना शेख रहिम खाटीक आदी चार जण जखमी झाले होते. पोलिसांनी तत्काळ धाव घेवून वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी घटना टळली.
दरम्यान, दुस:या गटाचे भूषण हटकर यांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन मकसूद खाटीक, सलीम शेख बिसमिल्ला खाटीक व रईस शेख सलीम खाटीक या तीन जणांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सचिन मुंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.