शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

जळगाव व रावेर दोन्ही जागा राष्ट्रीवादीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:08 IST

अजित पवार यांची माहिती

ठळक मुद्देउमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरलेले नाहीअ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही

जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्चतच असून राज्यातील ४८ पैकी पुणे, औरंगाबाद, जालना आणि रत्नागिरी या चार जागा सोडल्या तर इतर ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. यानुसार जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच राहतील, असा निर्वाळा दिला. तसेच या ठिकाणी उमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या ‘परिवर्तन’ यात्रेच्या निमित्ताने हे नेते जळगावात शुक्रवारी आले होते. शनिवारी दुपारी चोपड्याकडे रवाना झाले, तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शनिवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, राज्य महिलाध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगर अध्यक्ष नामदेवराव पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, सविता बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अजित पवार यांनी सांगितले की, आघाडी झालीच आहे फक्त इतर आणखी कोणत्या पक्षांचा समावेश यात करायचा हे ठरायचे बाकी आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याच्या प्रयत्न असून इतर सोबत येणाऱ्या पक्षांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून त्यांना जागा देतील. दरम्यान खडसे हे भाजपातच असल्याने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांनाा उमेदवारी देण्याबाबत काहीही विचार करण्याचा प्रश्नच नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी होणाºया चर्चेबाबत दिले.ईश्वरलाल जैन यांचे मत हे पक्षाचे मत नाहीजामनेर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी खासदार यांनी भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या, यासंदर्भात पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जैन यांचे वक्तव्य किंवा मत हे पक्षाचे नसून त्यांचे वैयक्तीक आहे.त्या वक्तव्याला फारसे महत्व नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.बोंड अळीच्या नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणारबोंड अळीमुळे झालेली नुकसान भरपाई ही देण्यात आली आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली असली तरी जिल्ह्यात अनेकांना ही भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी आपण मंत्रालयात याचा पाठपुरावा करु, असेही अजित पवार यांनी सांगितले.शेवटच्या क्षणी युती होण्याची शक्यताभाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता जरी भांडत असले तरी त्यांना माहीत आहे, की आपण स्वतंत्र लढलो तर काही खरे नाही. यामुळे हे दोन्ही पक्ष ऐन निवडणुकीच्या दरम्यान एकत्र येतील व युती करतील, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली.आता अनेक घोषणा होतीलयावेळी पवार म्हणाले की, भाजपाचे आतपासूनच चुनावी जुमले सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या महामंडळांना ७०० कोटी त्यांनी जाहीर केले मात्र अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मान्यता मिळाल्यावरच ते देता येतील परंतु तो पर्यंत आचारसंहिता लागू होईल. यामुळे हे पैसे देतातच येणार नाही. अशाच प्रकारे आता अनेक घोषणा आता होतील.‘ते’ भारतीय कसले- भुजबळभाजपाने मुस्लीम, दलित आदी समाजांचा द्वेषच केला आहे. भारतीय संविधान आणि संस्कृती हे शिकवत नाही, त्यामुळे ते भारतीय कसेले? असा सवालही छगन भुजबळ यांनी करीत भाजपाने या समाजांवर अन्यायच केला असल्याचा आरोप केला.महिला आघाडी मुख्यमंत्र्यांना घुंगरु पाठविणारराज्य सरकाने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच राज्यात डान्सबारला न्यायालयाकडून परवानगी दिली असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील. सरकार आणि डान्सबारचालक यांची मिलिभगत असल्याचा आरोप करीत याचा निषेध म्हणून महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कुरिअरने घुंघरु पाठविणार असल्याचे फौजिया खान यांनी पत्रपरिषदेत सांगितले.रावेरची जागा मिळण्याची काँग्रेसला खात्रीजिल्ह्यातील दोन जागांपैकी एकेक जागा दोन्ही पक्षाला मिळाल्यास ते दोन्ही पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर राहील व रावेरची जागा काँग्रससाठीच घेतली जाईल, असे आश्वासन आम्हाला वरिष्ठांनी दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी अजित पवार यांच्या विधानासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना दिली. या जागेसाठी त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार आमच्याकडेच असल्याचेही ते म्हणाले.अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाहीजळगाव लोकसभा मतदार संघासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विचार केल्यावर आमच्याकडे उमेदवार नाहीत का? असा अर्थ काढला जाणे चुकीचे आहे. अनेकदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना संधी दिली जाते. त्यानुसारच आमचा हा प्रयत्न आहे. ही उमेदवारी स्वीकारण्याबाबत अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.आरक्षणाबाबत बनवाबनवी५० टक्के पेक्षा आरक्षण देता येणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी मागे म्हटले असताना आता सवर्णांना आरक्षण जाहीर केले आहे, तर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही परवानगीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा विषयही ताटकळला असल्याचा आरोप पवार यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण