ममुराबादला दोन्ही माजी सरपंचांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:30+5:302021-01-19T04:18:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन माजी सरपंच व एका माजी उपसरपंच ...

ममुराबादला दोन्ही माजी सरपंचांची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन माजी सरपंच व एका माजी उपसरपंच महिलेने बाजी मारली आहे. उर्वरित जागांवर अपवाद वगळता बहुतांश नवख्या उमेदवारांना यावेळी मतदारांनी संधी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात ४३ उमेदवार होते. त्यात माजी सरपंच हेमंत गोविंद चौधरी व अमर गंगाराम पाटील तसेच माजी उपसरपंच सुनीता अनंत चौधरी आदींचाही समावेश होता. तिघांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली. याशिवाय, माजी जि.प. सदस्य (कै.) गुलाब खोलू सोनवणे व माजी सरपंच रमाबाई सोनवणे यांचे चिरंजीव विलास सोनवणे तसेच माजी सरपंच (कै.) गोविंद हरी चौधरी यांची सून साधना सुनील चौधरी, माजी सरपंच (कै.) संतोष लाला शिंदे यांची सून अंजनाबाई सुरेश शिंदे, माजी सरपंच भाग्यश्री मोरे यांचे वडील व पंचायत समितीचे माजी सदस्य दुर्गादास मोरे यांचे बंधू गोपालकृष्ण उखा मोरे हे विजयी झाले. अटीतटीच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार प्रत्येक वाॅर्डात परस्परविरोधी दोन पॅनल तयार होऊन त्यांच्यात सरळ लढती रंगल्या.
ममुराबाद विजयी उमेदवार
वाॅर्ड १ : हेमंत गोविंद चौधरी, रंजना जितेंद्र ढाके
वाॅर्ड २ : शैलेंद्र यशवंत पाटील, अमर गंगाराम पाटील, लताबाई अशोक तिवारी
वाॅर्ड ३ : संतोष रामदास कोळी, प्रीतम ज्ञानेश्वर पाटील, आरती सचिन पाटील
वाॅर्ड ४ : विलास गुलाब सोनवणे, अंजनाबाई सुरेश शिंदे, कल्पना विलास शिंदे
वाॅर्ड ५ : अनिस भीकन पटेल, एजाज अजित पटेल, आशमाबी शेख नाशीर
वाॅर्ड ६ : गोपाळकृष्ण उखा मोरे, साधना सुनील चौधरी, सुनीता अनंता चौधरी