बॉटनिस्ट प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा सरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 20:44 IST2018-12-10T20:43:10+5:302018-12-10T20:44:14+5:30
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणी जीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित आढळणारा सरडा आढळला.

बॉटनिस्ट प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा सरडा
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणी जीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित आढळणारा सरडा आढळला.
याबाबत आनंद व्यक्त करताना प्रा.चौधरी यांनी या सरड्याच्या पेशीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, हा सरडा निसर्गाचा अप्रतिम आविष्कार आहे. असे दुर्मिळ जीवजंतू यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे. आजकाल टीव्ही आणि मोबाइलमुळे आपले निसर्गाशी संवाद होत नाही. निसर्ग मानवाच्या दु:खांना नष्ट करीत जीवनात आनंद आणतो. या शोधाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व पदाधिकारी, प्राचार्य प्रा.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.ए.कुमावत, प्रा.डी.आर तायडे, प्रा.जयश्री पाटील, प्रा.सरला तडवी, प्रा.शिवाजी मगर यांनी प्रा.नितीन चौधरी यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा.चौधरी यांनी असेच संशोधन यापुढेही करीत राहणार असल्याचे सांगितले.