कर्जदार महिलेस अटक
By Admin | Updated: April 10, 2017 00:11 IST2017-04-10T00:11:35+5:302017-04-10T00:11:35+5:30
जामनेर येथील जैन पतसंस्थेतील सरोज पवन राका या कर्जदार महिलेस पोलिसांनी अटक केल्याची घटना

कर्जदार महिलेस अटक
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 10 - जामनेर येथील जैन पतसंस्थेतील सरोज पवन राका या कर्जदार महिलेस पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवारी सायंकाळी जामनेरात घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जैन समाजबांधवांनी महिलांसह पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी रात्री ठिय्या आंदोलन केले.

कोणताही गंभीर गुन्हा नसताना केवळ राजकीय आकसापोटी ही कारवाई झाल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना व संभाजी ब्रिग्रेडने या प्रकाराचा निषेध केला आहे.
जामनेरातील सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या संचालकांसह काही कर्जदारांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. लेखा परीक्षक दीपक अट्रावलकर यांनी रविवारी पोलिसात दिलेल्या जबाबावरून कर्जदार महिला सरोज राका यांना अटक करण्यात आली.
महावीर जयंतीनिमित्त मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम सुरू होते. यातच राका यांच्या अटकेचे वृत्त आल्याने सर्व महिला पोलीस ठाण्यात पोहचल्या. याठिकाणी आधीच जमाव जमला होता. महिलांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरु केले.|